NMMS परीक्षा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची शासकीय परीक्षा आहे, जी इ. ८ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी इ. १२ वी पर्यंत शिष्यवृत्ती मिळते, ज्यामुळे त्यांचा शैक्षणिक विकास सुलभ होतो.
या परीक्षेमध्ये खालील दोन प्रमुख पेपर्स समाविष्ट आहेत:
या परीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप कसे असते त्यांची काठिण्य पातळी कशी असते याची विद्यार्थ्यांना कल्पना यावी म्हणून या पुस्तकात पाच प्रश्नपत्रिका संच दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी वेळ लावून या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात.
मानसिक क्षमता कसोटी (Mental Ability Test - MAT) पूर्वी या विषयाला बुद्धिमत्ता कसोटी (Intelligence Test) असे म्हटले जात असे.
हा विषय शालेय अभ्यासक्रमाचा भाग नसला तरी बहुतेक सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये याचा समावेश केलेला असतो. या विषयाला निश्चित असा आखीव रेखीव अभ्यासक्रम नसतो, आणि वयोगटाचेही फारसे बंधन नसते. यामुळे १२ ते १३ वयोगटातील विद्यार्थ्यांना तसेच २० ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले जाऊ शकतात. काठीण्य पातळीचा फरक थोडाफार प्रमाणात असू शकतो.
इ. ८ वीत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या NMMS या शासकीय परीक्षेतून जे विद्यार्थी निवडले जातात, त्यांना पुढील शिक्षणासाठी इ. १२ वी पर्यंत शासनामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते.
या परीक्षेत दोन विषय असतात, त्यापैकी एक म्हणजे शालेय क्षमता चाचणी (Scholastic Aptitude Test - SAT).
SAT मध्ये खालील शालेय विषयांचा समावेश असतो:
विद्यार्थ्यांना अशा वेगवेगळ्या क्षमतांची चाचणी घेणारे प्रश्न कसे विचारले जातात आणि त्यांची उत्तरे कशी शोधायची असतात याचे विवेचन या पुस्तकात केलेले आहे. प्रत्येक विषयातील प्रश्न हे त्या त्या विषयातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ विषय तज्ञांकडून तयार करून घेतले आहेत.
Before Mental Ability Test (MAT) this subject was called Intelligence Test .
Although this subject is not part of the school curriculum, it is included in most of the competitive exams. The subject does not have a definite prescribed syllabus, and there is no age group restriction. Because of this, questions can be asked to students in the age group of 12 to 13 years as well as to students in the age group of 20 to 25 years. Difficulty level may vary slightly.
© Copyright Smart Computer (India) Private Limited, Pune (2023). All Rights Reserved Terms of use , Privacy Policy and Refund and Cancellation