National Means - Cum Merit Scholarship (NMMS) - सराव परीक्षा
NMMS परीक्षा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची शासकीय
परीक्षा आहे, जी इ. ८ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. या परीक्षेत
यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी इ. १२ वी पर्यंत शिष्यवृत्ती मिळते,
ज्यामुळे त्यांचा शैक्षणिक विकास सुलभ होतो.
या परीक्षेत खालील दोन प्रमुख पेपर्स समाविष्ट आहेत:
- १) मानसिक क्षमता कसोटी (MAT) - एकूण प्रश्न:
९०, वेळ: १० मि.
- २) शालेय प्रवणता कसोटी (SAT) - एकूण प्रश्न:
९०, वेळ: ९० मि.
शालेय प्रवणता कसोटीमध्ये (जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, इतिहास, भूगोल,
नागरिकशास्त्र आणि गणित यांचा समावेश) प्रश्नांची संख्या पुढीलप्रमाणे आहे:
- १) विज्ञान: ३५ (भौतिकशास्त्र - ११, रसायनशास्त्र - ११, जीवशास्त्र
- १३)
- २) समाजशाख: ३५ (इतिहास - १५, नागरिकशास्त्र - ५, भूगोल - १५)
- ३) गणित: २०
सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील; प्रत्येक प्रश्नाला चार पर्यायी उत्तरे असतील, त्यापैकी
सर्वात बरोबर पर्याय निवडायचा असतो. या परीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप आणि काठिण्य पातळी
याची कल्पना विद्यार्थ्यांना यावी म्हणून या पुस्तकात पाच प्रश्नपत्रिका संच दिलेले
आहेत. विद्यार्थ्यांनी वेळ लावून या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात.